Ajit Pawar
yesterday at 13:01. Facebook
मागील २ आठवड्यांपासून विधान सभेमध्ये विरोधी पक्ष सातत्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरतो आहे. दरम्यान, राज्याचा २०१७-२०१८ चा अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेचे निमित्त साधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण १९ सदस्यांना ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले. ही कारवाई सरकारने आकसपूर्ण पद्धतीने प्रस्तावित केली होती. ही कारवाई आकसपूर्ण व अन्याय्य...
View details ⇨
Ajit Pawar
yesterday at 03:28. Facebook
स्वातंत्र्याच्या ध्येयाने झपाटलेल्या आणि आपल्या देशासाठी मृत्यूला हसत कवटाळणाऱ्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन. त्यांच्या साहसाचे, निःस्सीम देशभक्तीचे स्मरण देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम राहील.

#शहीददिवस
Ajit Pawar
03/22/2017 at 10:50. Facebook
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या १९ आमदारांच्या निलंबनाविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर केलेल्या मूक आंदोलनात सहभाग घेतला. आमच्या आमदारांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला, हा आवाज दाबणाऱ्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो.

#MahaBudget17 #BudgetSession2017 #Loan #Waiver #Farmers #Protest #VidhanBhavan
Ajit Pawar
03/22/2017 at 08:36. Facebook
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणाऱ्यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल. बीड जिल्हा परिषदेतील पराभवास कारणीभूत असलेल्यांची गय पक्ष करणार नाही. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातील पक्षाचा...
View details ⇨
Ajit Pawar
03/20/2017 at 03:30. Facebook
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली २० मार्च रोजीच चवदार तळे सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजातीसाठी खुलं केलं. हा संग्राम केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी होता. समानतेसाठी आत्मभान जागवणाऱ्या या लढ्याचे म्हणूनच मोठे महत्त्व आहे. आजही अन्यायाविरोधात, विषमतेविरूद्ध लढण्यासाठी महाडमधील सत्याग्रह प्रेरणादायी ठरेल.

#डॉबाबासाहेबआंबेडकर #चवदारतळेसत्याग्रह
Ajit Pawar
03/18/2017 at 10:53. Facebook
Ajit Pawar
03/17/2017 at 12:48. Facebook
जिल्हा पातळीवर विद्यापीठांचे उपकेंद्र होण्यासाठी शासनाची कार्यवाही सुरु
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने केलेल्या आंदोलनाला यश

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने हा विषय लावून धरला होता. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय...
View details ⇨
#शेतकरी_कर्जमाफी च्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होऊन या शेतकरीविरोधी सरकारचा निषेध केला.

#BudgetSession2017 #Session #MahaBudget #Maharashtra #Farmers #Loan #Waiver #AjitPawar
अभंगवाणीच्या रुपाने जीवनावर महाभाष्य करणारे संत तुकाराम यांच्या महान कार्यास तुकाराम बीज दिनी शतश: प्रणाम! संत तुकाराम देवाशी एकरूप झाले तो आजचा हा दिवस. देवाशी तादात्म्य पावण्यापूर्वी वाङ्मयाशी संत तुकाराम एकरूप झाले. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. आजही त्यांची लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे, आणि अनादी-अनंत काळापर्यंत तुकोबांच्या रचना अजरामर राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती जिल्ह्याच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता. कोणताही ट्रेंड फॉलो न करता बारामतीत लोक मतदान करतात यासाठी बारामतीचे कौतुक करावे तितके कमीच. बारामतीच्या जनतेने यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे बारामतीकरांचा विश्वास कायम राहील असं काम आपण करावं.

आपल्याला मिळालेलं...
View details ⇨
प्रत्येक रंगाची एक वेगळीच किमया असते. निसर्गाने, प्रकृतीने अनेक रंगांची उधळण करत आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला दिला आहे. प्रत्येक रंग हा आपल्याला शिकवण देत असतो. ही शिकवण असते एकात्मतेची. सर्वांना सामावून घेण्याची. आज धुलिवंदनाच्या दिवशी जात, धर्म, भाषा यांचे भेद विसरून आपुलकीच्या रंगात रंगूया. सर्वांना होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#होळी #HappyHoli
व्यक्तीसदृश विचार, राजकीय व सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण असलेले निर्णयक्षम राज्यकर्ते म्हणून यशंवतराव चव्हाण यांचे नाव नेहमीच अग्रेसर राहील. महाराष्ट्राच्या उभारणीतील चव्हाणसाहेबांचे श्रेय वादातीत आहे. महाराष्ट्राच्या कृषी व औद्येगिक विकासाचा पाया त्यांनी रचला, राज्यात सहकारचे जाळे विणले. पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण यांना कायमच गुरूस्थानी मानले आहे व त्यांचा आदर्श समोर ठेवूनच कृषी व...
View details ⇨
रणांगणावर अतुलनीय पराक्रम गाजवण्याचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडून लाभलेले तेजस्वी 'शिव'पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन. शत्रूच्या सैन्याला न डगमगता त्यांनी मूठभर सैन्यासह स्वराज्यासाठी लढा दिला. संभाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य, युद्धाभ्यास आणि लढाऊ वृत्ती वदातीत होती. परकियांच्या क्रूर आक्रमणांपासून त्यांनी स्वराज्याचे संरक्षण केले तसेच त्यासाठी मृत्यू...
View details ⇨
शिक्षणाची गंगोत्री तळागाळातल्या मायलेकींच्या दाराशी नेणाऱ्या व शिक्षित होऊन स्वावलंबी बनण्याची प्रेरणा देणाऱ्या क्रांतिज्य़ोती सावित्रीमाई फुले यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन. परंपरावाद, रुढीवादाचा पगडा असलेल्या काळात सावित्रीमाईंनी दगड, शेणाचा मार खाऊन बहुजन समाज, महिलांना शिक्षण दिले. त्यांनी पेरलेल्या शिक्षणरूपी रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. भारतीय स्त्रियांनी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती...
View details ⇨
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होतो असा युक्तीवाद सरकारतर्फे केला जात आहे. असे काही तरी सांगून हे सरकार वेळकाढूपणा करत आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली पाहिजे. घोषणा होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही....
View details ⇨
गेल्या दोन वर्षांत ८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी १० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही. विधानसभेत आज या धगधगत्या विषयाला वाचा फोडली.

#BudgetSession2017 #Session #Maharashtra #Loan #Waiver
सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विधान भवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत ८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी १० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही, याची खंत वाटते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी...
View details ⇨
महिला या शब्दाबरोबर प्रेम, वात्सल्य, स्नेह, ममता या शब्दांना जोडले जाते. पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही डोळ्यासमोर उभी राहणे गरजेचे आहे. अबला या शब्दातील 'अ' ची जागा 'स'ने कधीच घेतली आहे. फक्त समाजाची ते मान्य करण्याची मानसिकता नाही. आजही स्त्री तिच्या हक्कांसाठी लढते आहे. तिच्या दिसण्यावर, वागण्यावर, पेहरावर अनेक बंधने लादली आहेत. समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीबाहेर जाणं म्हणजे परंपरांचे...
View details ⇨
राज्यातील दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

#SSC #Exam #Bestofluck
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सभागृहात माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. स्व. चंद्रकांत छाजेड यांच्याविषयी बोलताना राज्याने एक लढवय्या नेता गमावल्याचे दुःख होत होते. छाजेड यांनी तळगळातील लोकांशी नाते जोडले होते. त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असे. सभागृहातही ते आपली बाजू आक्रमकपणे मांडत आणि म्हणूनच...
View details ⇨