कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#मराठीराजभाषादिन
राष्ट्रवादी काँग्रेसवर ग्रामीण जनतेचा विश्वास...

गुरुवारी राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनुसार ग्रामीण भागातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे...
View details ⇨
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीच्या 10 पैकी 8 उमेदवारांचा विजय झाला असून परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि विजयाबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Dhananjay Munde यांनी परळीकरांचे आभारी मानले. तसेच जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखविलेला...
View details ⇨
परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी पुन्हा!

मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची व स्वच्छ कारभाराची पोचपावती देत परभणी जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ पैकी २४ जागी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परभणी जिल्ह्यातील सुजाण मतदार बंधु-भगिनी, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे, जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर व...
View details ⇨
आपल्या कीर्तनांमधून समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य करणारे संत गाडगेबाबा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! लहानथोर सर्वांनाच ते आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून विचार करायला प्रवृत्त करत. 'खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणासाठी पैसा तोच द्या हो' म्हणत त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. दीनदुबळयांसाठी त्यांनी धर्मशाळा आणि रुग्णालये सुरू केली. याप्रमाणेच स्वच्छतेचे व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासले. संत...
View details ⇨
राष्ट्रपती Pranab Mukherjee यांनी खासदार Sharad Pawar यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील भाषणात शरद पवार साहेबांच्या संसदेतील कार्यकालाचा गौरव केला होता. पवार यांनी खूप तरूण वयात राजकारणात पदार्पण केले. वयाच्या २७ व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले आणि ३८ व्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि संसदेत ते अव्याहतपणे काम करत आहेत. दोन वर्षांनंतरही...
View details ⇨
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी खा. Sharad Pawar यांच्याबद्दल आपले विचार प्रकट करताना प्रतिपादन केले की, "देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबाबत पवार यांच्यासोबत अनेक वेळा एकत्र बसून चर्चा केली आहे. १९८० च्या काळात, मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळत असताना आमच्यातील संवाद वाढला. विकासात्मक मुद्द्यांबाबतची पवारांची आवड तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, विस्तार...
View details ⇨
आज माननीय खासदार Sharad Pawar यांना संसदीय कारकीर्दीची ५० वर्ष पूर्ण होत आहेत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान भवन, दिल्ली येथे १० डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या कार्यक्रमात देशातील विविध मान्यवरांनी शरद पवार यांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी माननीय खासदार शरद पवार यांच्या पवार साहेबांच्या कार्याची प्रशंसा केली...
View details ⇨
पवारसाहेब हे स्वकर्तृत्वाचे मेरूमणी
राष्ट्रवादी मासिकातून खा. Sharad Pawar यांच्या ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा गौरव

राष्ट्रवादी मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सुवर्णगाथेला शब्दबद्ध करण्यात आले आहे. पवार यांच्या ५० वर्षांच्या संसदिय कारकिर्दीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...
View details ⇨
मतदान आपला हक्क, आपले कर्तव्य....

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी राज्यातील दहा महानगरपालिका, अकरा जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी आज झालेल्या मतदानप्रकियेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या वॉर्डमध्ये मतदान केले आणि नागरिकांना मतदानासाठी आवाहनसुद्धा केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. Sharad Pawar यांनी...
View details ⇨
राष्ट्रवादी मासिकात समाजाचे प्रतिबिंब दाखवणारा 'आरसा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार Hemant Takle यांचे समाजाचे खरे रूप दाखविणारे 'आरसा' हे सदर 'राष्ट्रवादी' मासिकात सुरू झाले आहे. आपल्या पहिल्याच 'लढाई अॅसिड अॅटॅकशी' या लेखात त्यांनी बिहारमधील एका अॅसिड अॅटॅक मधून बचावलेल्या तरूणीचा जीवनसंघर्ष मांडला आहे. एका बाजूला मुलीची डॉक्टर बनण्याची प्रचंड इच्छाशक्ती तर दुसऱ्या बाजूला न्याय...
View details ⇨
महाराष्ट्राचे परिवर्तनवादी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज द्वितीय स्मृतीदिन. पुरोगामी विचार टिकवण्यासाठी पानसरे यांनी अविरत संघर्षाची भूमिका घेतली. पानसरे हे खरे परिवर्तनवादी होते. लढाऊ कामगार नेते, अंधश्रद्धाविरोधीतील चळवळीचे खंदे समर्थक, साहित्यिक व व्याख्याते अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास कॉम्रेड म्हणवून केवळ कम्युनिस्ट कोंदणात बसवता येणार नाही. प्रतिगामी प्रवृत्तींच्या भ्याड...
View details ⇨
दुसऱ्या टप्प्यातील दहा महानगरपालिका, दहा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होत आहे. तत्पुर्वी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होऊन निवडणूक प्रचार थांबणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला सोशल मीडियावरील प्रचारही इथेच थांबवत आहे. पण तुम्ही थांबू नका. तुमचा मतदानाचा हक्क जरूर बजावा. निर्भयपणे...
View details ⇨
मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवावा – सचिन अहिर

आगामी मुंबई माहनगरपालिका निवडणुक मुंबई शहराच्या विकासाबाबत, मुंबईतील पाण्याच्या, रस्त्याच्या समस्या सोडवण्याबाबत आहे. तेव्हा मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहराचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष Sachin Ahir यांनी केले. ते...
View details ⇨
शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोक धात्रक, प्रदेश सरचिटणीस संजय बोरगे, तालुका अध्यक्ष मनोज अमरे, द. मुंबईचे सचिव दिपक पार्डिवाला आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...