Pankaja Gopinath Munde
03/23/2017 at 12:56. Facebook
आज विधान भवनातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील कंत्राटी (मानधनावरील) ग्रामसेवक ३ वर्ष सेवाकाळ आश्वासित प्रगती योजने अंतर्गत १२ वर्षांचा लाभ देण्यासंबंधी व इतर मागण्या संदर्भात चर्चा केली.

ग्रामसेवकांच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या दरमहा प्रवासभत्ता...
View details ⇨
Pankaja Gopinath Munde
03/23/2017 at 10:04. Facebook
लातूरच्या टिळक विद्यापीठातील पत्रकारीतेच्या विद्यार्थ्यांनी आज माझी विधानभवनातील दालनात भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच देशाच्या विकासात पत्रकारांची भुमिका महत्त्वाची असून विकासात सहभागी होऊन विकसीत भारत घडविण्यासाठी त्यांच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
Pankaja Gopinath Munde
03/23/2017 at 01:30. Facebook
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हुतात्मा झालेले शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना शहिद दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना यांनी संघटनेच्या मागण्यासाठी लेखणी बंद आंदोलन सुरू केले होते, आज संघटनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. सदर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने सुरु केलेले लेखणी बंद मागे घेतले.
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने भविष्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचा आणि पाणी अतिशय जपून वापरण्याचा आज संकल्प करूया !!
Pankaja Gopinath Munde
03/21/2017 at 11:24. Facebook
आज जिल्हा परिषद बीड चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बीड येथील सभागृहात पार पडली.

जिल्हा परिषद बीड च्या नवविर्वाचीत अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सौ. सविता विजय गोल्हार व उपाध्यक्ष म्हणून भारतीय संग्राम परिषद पक्षाच्या सौ. जयश्री राजेंद्र मस्के यांची निवड झाली.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी नंतर...
View details ⇨
Pankaja Gopinath Munde
03/17/2017 at 10:37. Facebook
केज तालुक्यातील येवता येथे दोन दिवसापूर्वी वीज पडून ओंकार सटवा निर्मल हा 15 वर्षीय मुलगा मृत्यू पावल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांना आधार दिला व राज्यशासना मार्फत 2 लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.
Pankaja Gopinath Munde
03/17/2017 at 09:15. Facebook
बीड जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीने कंटाळलेला बळीराजा या वर्षीच्या मान्सून ने सुखावला होता त्यातच काल-परवा जिल्ह्याच्या परळी, माजलगाव, अंबाजोगाई केज सह इतर तालुक्यात वादळी-वाऱ्यासह अवकाळी पावसानं आणि गारपीटीनं थैमान घातलं आहे. यामुळे मनुष्यहानी, शेतीमधील उभ्या पीकाचे नुकसान, राहते घराचे नुकसान, पशूहानी, वादळी वाऱ्यामुळं झाडे कोसळणे यामुळे शेतकरी अगदीच मेताकुटीला आला आहे. अशा वेळी...
View details ⇨
Pankaja Gopinath Munde
03/17/2017 at 07:24. Facebook
परळी तालुक्यातील कौठळी शिवारात वीज कोसळून मृत्युमुखी पडलेले अश्रूबा गायकवाड व सुशीलाबाई कुंभार यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबीयांना धीर दिला आणि राज्यशासनाच्या वतीने प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.

याच कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपये मदत करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.मागील 5-6 वर्ष पासून या...
View details ⇨
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती निमित्त आज विधान भवन आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मंत्री विनोद तावडे यांच्यासह आमदार उपस्थित होते.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्येबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच मयत स्वाती चव्हाण हिच्या आई वडिलांना मी भेटले. या पूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर देशात कठोर संदेश जाईल अशी कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले.

म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले...
View details ⇨
शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या वतीने आज " जागतिक महिला दिन सोहळा " पार पडला.

स्त्रीयांना घराचा आर्थिक कणा बनवा, स्त्री जन्म स्विकारण्यासाठी सर्वांनी स्त्री जन्माच्या स्वागताचे स्वयंसेवक व्हा, पुरुषांच्या जन्माची वाट न पाहता स्त्री जन्माचे स्वागत करा असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरु केली. राज्य शासनाने...
View details ⇨
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी आज भेटून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
International women's day
जागतिक महिला दिन #InternationalWomensDay यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथून live भाषण.
महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ८ मार्च २०१७ रोजी सकाळी ९.०० वाजता जागतिक महिला दिन सोहळा #InternationalWomensDay कार्यक्रम मुंबईत सुरु आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी CMOMaharashtra मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस,मुख्य मार्गदर्शक ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री मा.ना.पंकजा मुंडे तसेच ग्रामविकास राज्य...
View details ⇨
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! महिला दिनानिमित्त आज प्रत्येक महिलेने शपथ घ्यावी कि "मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही आणि करू देणार नाही. मुलगा व मुलगी यामध्ये भेदभाव करणार नाही तसेच दुसऱ्या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करणार नाही.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला. नावीन्यपूर्ण दळणवळणाची पायाभूत सुविधा पुरविणारी योजना म्हणून शासनाने भारत नेट कार्यक्रमांतर्गत डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व २९ हजार ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे एकमेकांशी जोडण्याचे निश्चित केले आहे. याआधीच २ ऑक्टोबर २०१६ रोजी नागपूर जिल्ह्याला, पहिला डिजिटल...
View details ⇨