Sharad Pawar
yesterday at 13:40. Facebook
देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या २६ फेब्रुवारी रोजी असलेल्या पुण्यतिथीदिनी नांदेड दौऱ्यावर होतो. याप्रसंगी शंकरराव चव्हाण स्मृती संग्राहलयाला भेट देऊन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Ashok Chavan यांच्यासमवेत संग्रहालयातील स्मृती चित्रांची व भेटवस्तूंची पाहणी केली. यानिमित्ताने स्व. शंकररावांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

#Nanded #Visit #SharadPawar
Sharad Pawar
yesterday at 03:30. Facebook
मराठी भाषा समृद्ध आणि विशाल आहे, तशीच ती लवचिक आहे. या भाषेतून अनेक साहित्यिकांनी अजरामर साहित्य प्रसवले आहे. अशा या आपल्या मातृभाषेचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा. आपली मराठी भाषा संवर्धित करण्याचा प्रण प्रत्येकाने करायला हवा. आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव आपल्या साहित्यातून व्यक्त करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक...
View details ⇨
Sharad Pawar
02/26/2017 at 14:35. Facebook
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि.लीट. पदवीने मा. राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते आज माझा सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या संसदीय कारकीर्दीस या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच वर्षी या मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीने मला सन्मानित करण्यात येत आहे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. मी हा सन्मान स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाड्यातील जनता आणि हैदराबादच्या मुक्तिलढ्यातील...
View details ⇨
Sharad Pawar
02/22/2017 at 09:32. Facebook
आज माझ्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण होत आहे. १९६७ साली याच दिवशी मला बारामतीच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य केले. त्यानंतर गेली ५० वर्षे विधान सभा, विधान परिषद, लोक सभा आणि राज्य सभा यांच्या माध्यमातून अखंडीतपणे मला सेवेची संधी मिळाली. याबद्दल मी जनतेचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो.

मी या ५० वर्षात बरेच चढ-उतार पाहिले; अनेक आव्हानांना सामोरे गेलो....
View details ⇨
शुन्यातून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बलाढ्य शत्रूशी लढा देऊन सुराज्य आणि स्वराज्यनिर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ता आहेत. उत्तम प्रशासनाचे उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या नावाचे निव्वळ राजकारण न करता या प्रभावी शासनकर्त्याचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून आधुनिक, विकसीत महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक...
View details ⇨
पिंपरी-चिंचवड येथील सभेत उपस्थितांशी संबाद साधत आहे...
पिंपरी-चिंचवड मधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना..
राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही, पक्ष निवडणुकीसाठी तयार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, हे लिखीत स्वरूपात द्यायला तयार आहोत, या लेखी निवेदनाची प्रत राज्यपालांनादेखील द्यायला तयार आहोत. मात्र शिवसेनेने देखील आपण सरकारला पाठिंबा देणार नाही, असे लिखीत स्वरुपात जाहीर करावे. वाटल्यास त्यांनी हे लेखी निवेदन मीडिआकडे...
View details ⇨
आबांना जाऊन दोन वर्षे झाली तरीही अजून ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. लोकहिताच्या आणि जनतेला हव्या असणाऱ्या योजना आणून आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका आबांनी बजावली. ग्रामोन्नती, व्यसनमुक्तसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेले कार्य मोठे आहे. डान्सबार बंदीचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील अनेक संसार उध्वस्त होण्यापासून आबांनी वाचविले. समाजाला एका चांगल्या प्रवाहात आणण्याचे...
View details ⇨
पुणे येथील जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधत आहे...

#Pune #FacebookLive #PracharSabha #SharadPawar
मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

या सरकारला सत्तेत येऊन अडीच वर्षे होऊन गेली आहेत. महाराष्ट्राने अडीच वर्ष या सरकारचा अनुभव घेतला आहे. अडीच वर्षांतच निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. या देशाने सरकारच्या एका वर्षानंतरही निवडणुका पाहिल्या आहेत. २३ तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवली तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादी...
View details ⇨
Sharad Pawar Facebook Live 13th February 2017
आपणा सर्वांशी संवाद साधणं आनंदाचं असतं. फेसबुक लाइव्ह या तंत्रज्ञानाच्या साह्याने या पेजवर आपण गप्पागोष्टी करू या... आज १३ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ४ वाजता. तुमच्या मनातले प्रश्न इथे मोकळेपणाने मांडा.
आज ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान कळवा येथील सभेत लोकांशी संवाद साधला. इथले नागरिक हे विकासाभिमुख आहेत. ठाण्याचा, कळव्याचा विकास होण्यासाठी येथे परिवर्तन होणे गरजेचे आहे, त्यासाठी ठाण्यात सत्तापालट होण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. या दोन्ही शहरात काही साम्य असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आहे. दोन्ही शहरात...
View details ⇨
आधुनिक भारताचे संत म्हणून गौरवण्यात आलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन. उपेक्षितांची समाजासोबत नाळ जोडताना बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले, यातून त्यांची प्रयोगशील वृत्ती दिसून येते. त्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ ह्या काव्यसंग्रहातून एक प्रतिभावान साहित्यिक म्हणून ते समाजासमोर आले. कुष्ठरोग्यांसाठी तसेच...
View details ⇨
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विकासात्मक बदल घडवेल असा विश्वास मानखुर्द येथील सभेत व्यक्त केला. तीन वर्षांपूर्वी एका भूल-भुलैयाने आम्हाला आश्वासने दिली. पण आता आम्ही फसणार नाही. मुंबई ही मिनी इंडिया आहे. इथे जर सेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं गेलं तर हा संदेश व परिवर्तनाची लाट देशभर जाईल अशी मला खात्री आहे. तीन वर्षांपूर्वी ऐकले होते की परिवर्तनाची आवश्यकता आहे. वादा करते है अच्छे दिन...
View details ⇨
सत्य, अहिंसा, शांतीचा संदेश देणारे आणि त्याला निर्भयतेची जोड देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वे आणि मूल्ये प्रत्येक पिढीसाठी आदर्शवत आहेत. गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण यासाठी लोकचळवळ उभारणारे गांधीजी हे द्रष्टे व्यक्तिमत्व होते. विचारांचा वारसा अमूल्य असतो आणि त्याचे जतन होणे आवश्यक असते. महात्मा गांधींच्या वैचारिक...
View details ⇨
आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत..
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!

#HappyRepublicDay #सन्मानलोकशाहीचा
मला पद्मविभूषण पुरस्काराचा सन्मान जाहीर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! माझा हा पुरस्कार अविरत कष्ट करून देशाला अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी झटणाऱ्या आपल्या देशाच्या शेतकऱ्यांना मी समर्पित करतो.

लातूर / उस्मानाबाद आणि मुंबईतल्या लोकांनी अतिशय कठीण प्रसंगीही धैर्य दाखवले, याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. तसेच, सर्व ठिकाणची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या...
View details ⇨