FBVideoDownloader.info is a facebook video downloader online, this tool helps you download facebook videos by grabs direct links to download and save for free
Vinod Tawde
4 hours 0 minutes ago. Facebook
नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील भाजपाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या सत्कार समारंभास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमवेत उपस्थित होतो. सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. भाजपाला जनतेच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे या समारंभात उत्साह दिसला.

‪Congratulated victorious BJP candidate of the recent Municipal Corporation and Municipal...
View details ⇨
Vinod Tawde
yesterday at 17:04. Facebook
नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयाने तयार केलेला रॅम्प आणि व्हिलचेअरच्या सुविधेचा शुभारंभ केला. हा प्रयोग खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे वृद्ध नागरिक व दिव्यांग प्रेक्षकांना संग्रहालय पाहण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे. अशा विविध प्रयोगांमुळे समाजातील वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना संग्रहालयात जाणे सोयीस्कर होईल.
मध्यवर्ती संग्रहालयात मेटल डिटेक्टर यंत्र, बॅग स्कॅनर, स्वयंचलित माहिती यंत्र व...
View details ⇨
Vinod Tawde
yesterday at 12:53. Facebook
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जनता विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आज नागपूर येथील विधिमंडळाला भेट दिली. या भेटीदरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानमंडळाच्या कामकाजाचा जवळून आढावा घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांशी विधानमंडळातील कामकाज तसेच विविध शैक्षणिक विषयांवर माझ्याशी चर्चा रंगल्या. चर्चेचा समारोप पुस्तक वाटपाने झाला.

Interacted with students of Janata Vidyalaya,...
View details ⇨
Vinod Tawde
yesterday at 11:48. Facebook
निष्ठापूर्वक परिश्रमांच्या बळावर शिक्षणप्रक्रियेत गुणवत्तापूर्ण परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत असलेल्या ५० शिक्षकांचा सन्मान करताना अतिशय आनंद झाला. या शिक्षकांच्या मेहनतीमुळे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आले, खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल १४००० विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे, ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे....
View details ⇨
Vinod Tawde
12/08/2016 at 13:55. Facebook
'शिक्षणाची वारी' ह्या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित होतो. राज्यभरातील ५० शाळांतील शिक्षक त्यात सहभागी झाले. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून राज्यातील शैक्षणिक प्रगती हे संघटित प्रयत्नांचे फळ आहे हेच सिद्ध होते.
प्रत्येक मुल १००% शिक्षित व्हावे यासाठी शालेय स्तरावर शिक्षकांद्वारे विविध प्रयोग होतात. शिक्षकांच्या याच प्रामाणिक प्रयत्नांचे एकत्रीकरण करून एक संमेलन...
View details ⇨
Vinod Tawde
12/07/2016 at 16:53. Facebook
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड कॉर्क, युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क, इंडिया स्टडी सेंटर, स्कुल ऑफ एशियन स्टडीज यांच्या दरम्यान 'उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण' कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार करण्यात आला.
या सामंजस्य करारामुळे संशोधन क्षेत्रातील संधी वाढतील, महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागांमध्येदेखील दर्जेदार शिक्षण पोहोचवता येईल, तेथील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे...
View details ⇨
Vinod Tawde
12/07/2016 at 09:29. Facebook
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यास वर्गात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील ११ विद्यापीठांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती करून घेण्यासाठी हे विद्यार्थी उत्सुक आहेत हे पाहून समाधान वाटले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन माननीय...
View details ⇨
Vinod Tawde
12/06/2016 at 06:56. Facebook
महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज चैत्यभूमी येथे आदरांजली वाहिली! 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' ही त्यांची शिकवण अंगी बाणवून, समाजोद्धाराचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजूट होऊ या.

Paid my obeisance to Mahamanav Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar at Chaitya Bhoomi on the auspicious occasion of Mahaparinirvan Din‬.
Let Dr. Babasaheb Ambedkar's message...
View details ⇨
Vinod Tawde
12/06/2016 at 05:44. Facebook
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका विद्वान भारतात पुन्हा जन्म घेईल का, याबद्दल मला शंका आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी गाजविलेल्या कर्तृत्वाला जगात कोठेही तोड नाही. महामानव आणि विश्वरत्न ही विशेषणे त्यामुळे केवळ त्यांनाच शोभून दिसतात. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या आठवणी जागवत असताना आपण त्यांनी दिलेली समतेची शिकवण आचरणात आणण्याचा संकल्प करू या.

Crowned...
View details ⇨
Vinod Tawde
12/05/2016 at 09:04. Facebook
आशिया कप टी-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! आम्हा सर्व देशवासीयांना तुमचा अभिमान वाटतो.

Congratulations to Indian women cricket team on winning Women's Asia Cup T20. Good game, girls!
Vinod Tawde
12/04/2016 at 09:33. Facebook
माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात वकिली करीत असतानाच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. 'चले जाव' चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना दोन वर्षे कारावासही झाला. ते घटना समितीचे सदस्यही होते. केंद्रीय अर्थ तसेच संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडे अंतराळ संशोधनाऐवजी अस्त्रविकासाचे काम सोपविण्याचा निर्णय वेंकटरमण यांनी घेतला...
View details ⇨
Vinod Tawde
12/04/2016 at 09:19. Facebook
This Navy Day, as our brave 'Men in White' stand proud guarding our shores, may their determination and courage continue to safeguard our freedom, strengthening our Nation’s unity.
Vinod Tawde
12/03/2016 at 16:49. Facebook
१७ वर्षाखालील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून आलेल्या खोखोपटूंचा उत्साह पाहून अतिशय आनंद झाला. यावेळी विविध जिल्ह्यातील खेळाडूंशी संवाद साधला.
करिअर घडविण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षणाबरोबरीनेच खेळांचेही महत्त्व आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त निपुण अॅथलीटस् घडावेत, भविष्यात ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाची शान वाढवावी यावर आमचा भर आहे....
View details ⇨
Vinod Tawde
12/03/2016 at 16:43. Facebook
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि एशियन चॅम्पियनशिपचे सुवर्णपदक विजेते देविंदर वाल्मिकी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

‪Interacted with Asian Championship gold medalist Devinder Walmiki, extended my congratulations on his amazing performance at the Asian Championships games and wished well for his future!
Vinod Tawde
12/03/2016 at 07:13. Facebook
खुदिराम बोस यांच्यासारख्या तरुणांमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ मिळाले होते. विद्यार्थीदशेत असल्यापासून त्यांनी स्वत:ला क्रांतीच्या कामात झोकून दिले होते. मुझफ्फरपूर हल्ल्यात त्यांना अटक केल्यानंतर सगळा गाव त्यांना बघण्यासाठी जमला होता. अगदी लहान वयात त्यांना फासावर लटकविण्यात आले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त करू या.

Let us bow down...
View details ⇨
Vinod Tawde
12/03/2016 at 07:00. Facebook
आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचे वर्णन साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असेच करता येईल. महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे राष्ट्रीय राजकारणात येण्याआधी त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि काही काळ वकिलीही केली. गांधीजींनी स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला तेव्हा प्रसाद यांनी आपल्या मुलाला इंग्रजी शाळेतून काढून बिहार विद्यापीठात भरती केले. पूर असो वा भूकंप ते सदैव...
View details ⇨
चारकोप सेक्टर ८ व ९ येथील म्हाडाच्या भूखंडावरील गृहनिर्माण संस्थांवर आकारण्यात आलेल्या अधिमूल्य रकमांसंदर्भात माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता जी यांच्यासोबत चर्चा केली. या गृहनिर्माण सोसायट्यांचे अधिमूल्य १९९३च्या आदेशानूसार पूर्वीच घेण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा अधिमूल्याचा आर्थिक बोजा टाकू नये आणि तेथे राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना दिलासा देण्याचा...
View details ⇨
महाराष्ट्रातील शासकीय महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालकांसोबत पार पडलेल्या बैठकीत शासकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व तेथे भेडसावणाऱ्या प्रशासकीय समस्या समजून घेतल्या. महाविद्यालयांमधील प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने आणि तेथील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करावा व त्यानुसार पुढील कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.
महाराष्ट्रातील शासकीय...
View details ⇨
गिरणी कामगारांसाठी म्हाडातर्फे घरांसाठी काढण्यात आलेल्या संगणकीय सोडतीसाठी उपस्थित होतो. स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून समाधान वाटले.

‪Humbling experience to witness the MHADA houses allocation for Mill workers through computerised lottery system, realising their dream of becoming home owners.
महाराष्ट्राचे पहिले काँग्रेसेतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज वाढदिवसानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन. त्यांच्या कार्यकाळात राज्याने पायाभूत विकासाची नवी उंची गाठली. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सरांनी केलेले काम उल्लेखनीय होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून शिवसेनेच्या वाटचालीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो, हीच सदिच्छा.