Zee Talkies
yesterday at 12:23. Facebook
नववर्षाचं स्वागत करूया धुमधडाक्यात. घेऊन येत आहोत 'गुढी पाडवा विशेष' कार्यक्रम खास तुमच्यासाठी. पाहायला विसरू नका 'टॉकीज नाईट्स' मंगळवार, २८ मार्च दु. १२ आणि संध्या. ७ वाजता आपल्या झी टॉकीजवर. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
yesterday at 12:03. Facebook
Watch the World Television Premiere of #Madaari, Tonight at 9 on ANDPictures. #PowerOfCommonMan
Zee Talkies
yesterday at 06:12. Facebook
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’चे पुनर्प्रक्षेपण, पाहायला विसरू नका आज दुपारी १२ वाजता आपल्या लाडक्या झी टॉकीजवर. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
yesterday at 02:30. Facebook
'शाळा' चित्रपटातील आपल्या भूमिकेने मराठी मनाला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणा-या अंशुमन जोशी याला झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/25/2017 at 15:01. Facebook
विविध मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले अष्टपैलू अभिनेते निळू फुले आणि अशोक सराफ. मराठी चित्रपटसृष्टीतील या हिऱ्यांना एक लाईक तर मिळायलाच हवा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/25/2017 at 14:07. Facebook
Zee Talkies
03/25/2017 at 07:37. Facebook
बीएससीची पदवी मिळवलेल्या प्रार्थनाने ही पत्रकारितेची नोकरी सोडून नंतर एका मराठी चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली होती. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/25/2017 at 02:30. Facebook
औरंगाबाद जिल्ह्यातील ‘देवगिरी’ किल्ला पूर्वी ‘सुरगिरी’ नावानं प्रचलित होता. राजा भिल्लम यादवानं बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होतं, असंही देवगिरीचं वर्णन आढळतं. पुढे मुघलांनी या किल्ल्यावर आक्रमण केल्यानंतर हा किल्ला ‘दौलताबादचा किल्ला’ म्हणून नावारूपास आला. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/24/2017 at 14:13. Facebook
रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा...
अभिनय, कविता, लेखन अशा विविध क्षेत्रात कारकीर्द खुलवणाऱ्या स्पृहा जोशीचा हा लाघवी फोटो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/24/2017 at 07:31. Facebook
मराठी चित्रपटसृष्टीतील एक भारदस्त नाव म्हणजे विक्रम गोखले. आपल्या प्रत्येक भूमिकेची दखल घ्यायला लावणाऱ्या या ‘लय भारी अभिनेत्या’ची कोणती भूमिका तुम्हाला अधिक आवडली? #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/24/2017 at 02:30. Facebook
‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्या सोबतचा गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकरचा बालपणीचा फोटो तुम्हालाही आवडला असेल तर नक्की लाईक करा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/23/2017 at 13:01. Facebook
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने... निर्मळ हास्याच्या पूजा सावंतच्या या फोटोला एक लाईक तर मिळायलाच हवा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/23/2017 at 07:06. Facebook
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या नायिका श्रुती मराठे आणि मृण्मयी देशपांडे. श्रुतीची मनमोहक अदा की मृण्मयीचं निरागस हास्य यापैकी तुम्हाला काय आवडलं? #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/23/2017 at 02:30. Facebook
प्रेक्षकांसमोर वास्तववादी चित्रपट आणणारे मराठी चित्रपटसृष्टीतील दोन संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि रवी जाधव. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/22/2017 at 13:09. Facebook
अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ९० च्या दशकातील हा गाजलेला चित्रपट तुम्हाला आठवतोय का? तुम्हाला या चित्रपटाचे नाव माहीत असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/22/2017 at 06:50. Facebook
अप्रतिम अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची हक्काची जागा निर्माण करणारी ‘लय भारी अभिनेत्री’ प्राजक्ता माळी. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/22/2017 at 03:00. Facebook
आपल्या भन्नाट अभिनयानं प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/21/2017 at 15:01. Facebook
मालिका, सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मनवा नाईक आणि निर्माते सुशांत तुंगारे या नवविवाहित दाम्पत्यांस भावी सहजीवनासाठी झी टॉकीजतर्फे हार्दिक शुभेच्छा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/21/2017 at 11:55. Facebook
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी...

माझे जगणे होते गाणे... कुसुमाग्रजांच्या या काव्यानं आयुष्यातील कवितेचं महत्व विशद केलं आहे. शब्दरुपात भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. झी टॉकीजतर्फे जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #AaplaZeeTalkies
Zee Talkies
03/21/2017 at 07:07. Facebook
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हेमंत ढोमे यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #AaplaZeeTalkies